Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 171 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या दीनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दोन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 171 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 213 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 99 हजार 053 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 88 हजार 197 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 06 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8994 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 1862 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 1862 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 181 रुग्ण गंभीर आहेत.
तर 288 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7831 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 32 लाख 69 हजार 968 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
(Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | 171 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | तळजाई हिल टॉप हिल स्लोपवरील ‘बहुचर्चित’ जैवविविधता उद्यानाचा मास्टरप्लॅन मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

KCC | खुशखबर ! मोदी सरकार सर्व शेतकर्‍यांना देणार ‘किसान क्रेडिट कार्ड’, ‘इथं’ करा अर्ज आणि घ्या ‘लाभ’, जाणून घ्या प्रोसेस

Bhagatsingh Koshyari | … अन् राज्यपालांनी भर स्टेजवर महिलेचा मास्क खाली ओढला (व्हिडीओ)