Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 183 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. रविवारी (दि.10) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 118 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 2 हजार 465 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 91 हजार 997 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

शहरामध्ये आजपर्यंत 34 लाख 38 हजार 350 जणांची कोरोना चाचणी (Pune Corona) करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 2 हजार 465 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9053 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते. आजपर्यंत 4 लाख 91 हजार 997 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 1 हजार 415 इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.10) 118 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 927 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. आज दिवसभरात 05 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 2 पुणे शहरातील आहेत तर 3 जण पुण्याबाहेरील आहेत. शहरामध्ये 175 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 224 इतकी आहे.

 

Web Title :- Pune Corona | 183 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Earn Money | दरमहा 2 लाख रूपयांपर्यंत होईल ‘कमाई’ ! आजपासूनच सुरू करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, 90% मदत सरकार करेल

World Mental Health Day 2021 | ‘चाणाक्ष’ बुद्धी पाहिजे असेल तर सेवन करा ‘या’ 10 गोष्टी, मेमरी लॉस-अल्झायमर राहील दूर; जाणून घ्या

How To Become Rich | श्रीमंत व्हायचंय का? अवलंबा ‘या’ 10 दमदार पद्धती, बदलून जाईल संपूर्ण जीवन