Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 189 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये आज (बुधवार) 189 कोरोनाबाधित (Pune Corona) रुग्ण आढळून आले आहे. तर 141 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आज पुणे शहरामध्ये विविध तपासणी केंद्रावर 8 हजार 237 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. शहरात दिवसभरात 5 रुग्णांचा कोरोनामुळे (Pune Corona) मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात सध्या 1 हजार 442 सक्रिय रुग्ण (Active patient) आहेत. दिवसभरात मृत्यू (Death) झालेल्या 5 रुग्णांमध्ये 3 रुग्ण पुणे शहराबाहेरील आहेत तर 2 रुग्ण पुण्यातील आहेत. शहरात आजपर्यंत 9 हजार 027 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून बरे होण्याऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र आज नवीन रुग्णांची संख्या (Pune Corona ) वाढली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, शहरात 184 गंभीर रुग्ण असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 211 इतकी झाली आहे. शहरात आतापर्यंत 33 लाख 59 हजार 807 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 5 लाख 841 जण कोरोनाबाधित आढळून (Total Cases till date) आले आहेत. त्यापैकी 4 लाख 90 हजार 372 जणांनी कोरोनावर मात (Recover) केली आहे.

Web Title :- Pune Corona | 189 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours; Learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Honeymoon | ‘हनीमून’दरम्यान जोडप्यासोबत घडली विचित्र घटना, 27 वर्षीय तरूणीला चक्क 10 दिवस अनोळखींसोबत ‘झोपावं’ लागलं

Sharad Pawar | ‘सुप्रियानं’ साकारला शरद पवारांचा पुतळा; खा. सुप्रिया सुळेंकडून ‘कौतुक’

CM Uddhav Thackeray | शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर वसवलं जाणार