Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 194 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (मंगळवार) पुणे शहरातील कोरोनाच्या (Pune Corona) नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दोन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 178 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 194 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 98 हजार 468 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 87 हजार 598 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2 रुग्णाचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8983 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 1887 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 1887 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 191 रुग्ण गंभीर आहेत.
तर 290 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6050 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
(Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | 194 patients discharged from Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Relationship | कलयुग ! विवाहित महिलेचं ‘एक्स बॉयफ्रेंड’सोबत ‘झेंगाट’, दिला 3 मुलांना जन्म; कारण ऐकून व्हाल ‘हैराण’

Supreme Court | SC चा वकीलांना भरपाई देण्यास नकार; दंड लावून म्हटले – ‘काळा कोट घालणारे सामान्य लोकांपेक्षा वेगळे नाहीत’

Gold Price Today | पुन्हा कमी झाले सोन्याचे दर, चांदीची किंमत वाढली; जाणून घ्या आजचे नवीन दर