Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 196 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Pune Corona) संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 196 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 289 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 84 हजार 080 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 72 हजार 529 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8696 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2855 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 235 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6277 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.38 %

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 71 हजार 437 रुग्णांपैकी 10 लाख 43 हजार 371 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 9 हजार 994 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.38 टक्के आहे.

Web Title :- Pune Corona | 196 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल