Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 220 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेवर आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 220 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 304 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 88 हजार 902 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 77 हजार 883 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8813 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2206अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2206 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 202 रुग्ण गंभीर आहेत. तर 354 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7640 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 29 लाख 43 हजार 963 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title :- Pune Corona | 220 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Olympics 2020 | टोकियोमध्ये भारताचे ‘हे’ 7 चॅम्पियन, जाणून घ्या त्यांच्या बाबत

Pune Unlock | अखेर पुण्यातील निर्बंध शिथिल ! वीकेंड लॉकडाऊनही रद्द, दुकाने दिवसभर तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु; मात्र अजित पवारांनी दिला ‘हा’ इशारा

PM Kisan | खुशखबर ! उद्या शेतकर्‍यांच्या खात्यात येणार 2000 रुपये, ‘या’ पध्दतीनं तपासा यादीतील तुमचं नाव