Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 228 नवीन रुग्ण, 344 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (pune corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 228 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 344 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. Pune Corona | 228 new corona patients in Pune city in last 24 hours

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 82 हजार 251 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 70 हजार 720 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8663 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2868 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2868 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 226 रुग्ण गंभीर आहेत. तर 510 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5840 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 27 लाख 46 हजार 877 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title : Pune Corona | 228 new corona patients in Pune city in last 24 hours

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Chris Gayle | क्रिस गेल ने रचला इतिहास, 7 चेंडूत पाच षटकारांसह ठोकले अर्धशतक; T20 मध्ये 14000 धावा बनवणारा पहिला फलंदाज बनला

Pune Municipal Corporation | वाहन भत्ता मिळत असताना महापालिकेचे वाहन वापरणारे अधिकारी ‘रडार’वर; संबधित अधिकार्‍यांकडून वसुलीचे महापालिका प्रशासनाचे आदेश

Solapur Crime News | खळबळजनक ! पोलिसांना पाहताच विवाहितेची जळती चिता सोडून नातेवाईकांनी काढला पळ; धक्कादायक बाब समोर