Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 237 कोरोना मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corona | कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याचे समोर येत असलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 86 नवे रूग्ण आढळले आहेत तर दिवसभरात 237 जण कोरोना मुक्त (Pune Corona) झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील तिघांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे.

पुण्यातील एकुण कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता 4 लाख 99 हजार 459 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी तब्बल 4 लाख 88 हजार 884 रूग्ण हे बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे 1 हजार 571 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह असून त्यापैकी 173 क्रिटिकल आहेत. त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 9 हजार 4 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 6 हजार 11 जणांची कोरोनाच्या तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 86 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.

 

Web Title : Pune Corona | 237 corona free in last 24 hours in Pune, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sinhagad Road Flyover | पुणेकरांसाठी खुशखबर ! कात्रज चौक आणि सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी; उड्डाणपुलाचे भुमिपूजन नितीन गडकरी गडकरींच्या हस्ते (व्हिडीओ)

Solapur Crime | करमाळा बलात्कार प्रकरणात मनोहर भोसलेला तब्बल ‘एवढया’ दिवसाची पोलिस कोठडी

Maharashtra Rains | आगामी 3 दिवसात मुंबईसह पुण्यात जोरदार पाऊस ‘कोसळणार’ !