Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 237 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत आज (मंगळवार) वाढ पहायला मिळत आहे. मध्यंतरी रुग्ण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) वाढले होते. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 237 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 181 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात (Pune Corona) आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 87 हजार 800 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 76 हजार 659 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 07 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8786 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 2355 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5453 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 29 लाख 559 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 2355 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 237 रुग्ण गंभीर आहेत.
तर 351 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title : Pune Corona | 237 new patients of Corona in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस असल्याचे भासवून एसटी प्रवाशांचे सव्वा कोटी लुटले

PM Kisan | खुशखबर! 12.11 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येणार आहेत 2000 रुपये, चेक करा कधी येणार पैसे?

Pune Corporation | महापालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती