Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 241 नवीन रुग्ण, जाणून इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज (शुक्रवार) वाढ पहायला मिळत आहे. मध्यंतरी रुग्ण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) वाढले होते. मध्यंतरी बरे होणाऱ्या रुग्णांची (Pune Corona) संख्या कमी झाल्याने शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 241 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 239 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 97 हजार 853 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 86 हजार 660 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8969 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 2224 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8329 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 32 लाख 20 हजार 457 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 2224 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 214 रुग्ण गंभीर आहेत. तर 296 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title : Pune Corona | 241 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, knowing other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nipah Test Kit | तासाभरात निपाहची लागण झाली की नाही हे समजणार; भारतात टेस्ट किटला परवानगी

Pune Rains | आगामी 5 दिवस पुण्यात ‘मुसळधार’ पाऊस ! IMD कडून अलर्ट’

Congress | राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्यसभा की विधानसभेवर संधी? काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष