Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 250 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 250 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 327 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 85 हजार 716 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 74 हजार 193 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8731 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2792 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2792 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 231 रुग्ण गंभीर आहेत. तर 349 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6987 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
आज पर्यंत पुणे शहरामध्ये 28 लाख 39 हजार 685 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत,
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title :- Pune Corona | 250 new patients of Corona in the last 24 hours in Pune city, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maval News | दुर्दैवी ! बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी धावला बाप, दोन मुलांसह वडिलांचा बुडून मृत्यू

Nalasopara Crime | नालासोपाऱ्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2.5 लाखांचे कंडोम जप्त; एक तृतीयपंथी अन् तिघींची सुटका

Pune Crime | कोंढव्यात टोळक्याकडून 2 तरुणांवर कोयत्याने वार, एकाला अटक