Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 250 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ पहायला मिळत आहे. मध्यंतरी रुग्ण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) वाढले होते. परंतु मागील काही दिवसांपासून शहरामध्ये दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णापेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक अढळून येत आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Pune Corona) संख्या वाढत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 250 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 222 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 85 हजार 285 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 73 हजार 535 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8720 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 3030 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8403 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 28 लाख 25 हजार 078 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 3030 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 224 रुग्ण गंभीर आहेत.
तर 361 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Title :-  Pune Corona | 250 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KCC-Kisan credit card | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 2 दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा किसान क्रेडिट कार्डमधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

Aadhaar Virtual Id | प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, मिनिटात बनवा व्हर्च्युअल आयडी आणि करा आवश्यक कामे

पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन