Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 257 नवीन रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या (Pune Corona) संख्येत वाढ पहायला मिळत आहे. मध्यंतरी रुग्ण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Pune Corona) वाढले होते. परंतु मागील काही दिवसांपासून शहरामध्ये दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णापेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक अढळून येत आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या वाढत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 257 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 163 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 94 हजार 724 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 83 हजार 506 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8907 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

शहरात 2311 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9685 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 31 लाख 01 हजार 756 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 2311 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 206 रुग्ण गंभीर आहेत.
तर 282 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Title : Pune Corona | 257 new corona patients in Pune city in last 24 hours, increase in number of active patients, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update