Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 268 नवीन रुग्ण, 226 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona | पुणे शहरामध्ये (Pune City) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. पुणे शहरामध्ये (Pune City) गेल्या 24 तासात 268 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 226 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 80 हजार 150 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 68 हजार 812 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 06 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8622 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 2716 ॲक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5228 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 27 लाख 02 हजार 920 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 2716 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यापैकी 284 रुग्ण गंभीर आहेत. तर 450 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title :  pune corona | 268 new corona patients in Pune city in last 24 hours

हे देखील वाचा

 

Modi Cabinet Expansion | PM मोदींचे सर्व कार्यक्रम रद्द, मंत्रिपदासाठी ‘ही’ संभाव्य यादी तयार; महाराष्ट्रातून ‘या’ नेत्यांची नावं

Bibwewadi Police | चौघींसोबत झेंगाट अन् 53 जणींसोबत लग्नाची बोलणी करत 53 लाखांना गंडा, पोलिसांकडून भामट्याला अटक; जाणून घ्या प्रकरण

Nana Patole । नाना पटोलेंचे विधानसभेत गंभीर आरोप; म्हणाले – ‘माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान’