Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 282 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे (Pune Corona) प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 282 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 122 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 94 हजार 467 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 83 हजार 343 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8902 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

शहरात 2222 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 9278 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 30 लाख 92 हजार 071 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 2222 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत. त्यापैकी 210 रुग्ण गंभीर आहेत.
तर 279 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Title : Pune Corona | 282 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Earn Money | कमाईची गोष्ट ! दूध, तूप, लोणी विकून महिन्याला होऊ शकतं 3 लाखाचं ‘इन्कम’, ‘ही’ कंपनी देतेय संधी; जाणून घ्या

Yahoo News | Yahoo च्या न्यूज वेबसाइट्स आता भारतात करणार नाहीत काम, जाणून घ्या तुमच्या याहू अकाऊंटचे काय होणार

NPCIL Recruitment 2021 | ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी! न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशनमध्ये लवकरच मोठी भरती