Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 244 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे शहरामध्ये (Pune City) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Pune Corona) संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांच्या (Pune Corona) तुलने बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 244 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 139 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 88 हजार 293 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 77 हजार 048 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 06 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8797 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 2448 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 8469 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 29 लाख 17 हजार 340 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 2448 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत.
त्यापैकी 209 रुग्ण गंभीर आहेत. तर 361 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IAF Recruitment 2021 | ‘या’ उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय हवाई दलात होणार भरती

BSNL | बीएसएनएलचा धमाका प्लॅन ! 120 दिवसांसाठी 240 GB Data सहित आणखी काही मिळणार सुविधा

Modi Government | भारतातून चोरीला गेलेला 75 % वारसा मोदी सरकारच्या 7 वर्षात परत आला – जी किशन रेड्डी