Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 314 नवीन रुग्णांचे निदान, 231 रुग्णांना डिस्चार्ज, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 हजारांवर

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात रुग्ण वाढत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर गेली आहे. त्यामुळे थोडी चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये (Pune city) 314 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 231 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. Pune Corona | 314 new cases of Corona diagnosed in Pune in last 24 hours

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 81 हजार 227 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 69 हजार 567 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 05 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8642 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 3018 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 3018 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 236 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 6890 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे. आतपर्यंत 27 लाख 22 हजार 935 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.35 %

पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 60 हजार 587 रुग्णांपैकी 10 लाख 32 हजार 457 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 10 हजार 168 आहेत. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 962 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.35 टक्के आहे.

Web Title : Pune Corona | 314 new cases of Corona diagnosed in Pune in last 24 hours

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune-Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 2 ठार तर 1 जखमी

Pankaja Munde । एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीवरून भाजप नेत्या पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Jyotiraditya Shinde । ज्योतिरादित्य शिंदेमुळेच प्रियंका चतुर्वेदीनी काँग्रेस पक्षाला दिली सोडचिट्ठी?; ‘या’ पुस्तकातून खुलासा