Pune Corona | गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 331 नवीन रुग्ण, 253 जणांना डिस्चार्ज; अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Corona |पुणे शहरामध्ये (Pune City) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मध्यंतरी रुग्ण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) वाढले होते. परंतु मागील काही दिवसांपासून शहरामध्ये दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णापेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक अढळून येत आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे (Pune) शहरामध्ये गेल्या 24 तासात 331 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 253 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. Pune Corona | 331 new corona patients in last 24 hours

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 80 हजार 913 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 69 हजार 336 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 08 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 05 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8636 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 2941 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6099 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 27 लाख 16 हजार 045 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 2941 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 244 रुग्ण गंभीर आहेत. तर 461 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Title : Pune Corona | 331 new corona patients in last 24 hours

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Local Train | पदभार स्वीकारताच रावसाहेब दानवे अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबई ‘लोकल’बद्दल केली मोठी घोषणा

Eknath Khadse । ‘कुछ तो होने वाला है’, असे मेसेज जळगावात फिरतायत’

Devendra Fadnavis । केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यामुळे खा. प्रीतम मुंडे नाराज? देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया