Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 333 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या (Pune Corona) संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या वाढत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 333 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे तर 187 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 85 हजार 035 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 73 हजार 313 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8715 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 3007 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 7791 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 28 लाख 16 हजार 675 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 3007 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 224 रुग्ण गंभीर आहेत. तर 372 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Title :-  Pune Corona | 333 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे