Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 334 नवीन रुग्ण, 212 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (pune corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे तर कोरोनामुक्त (Recover) होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 334 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे (Pune Corona) तर 212 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 82 हजार 916 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 71 हजार 209 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8674 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 3033 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 3033 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 225 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 7696 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
आजपर्यंत 27 लाख 62 हजार 672 प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे,
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Titel :- Pune Corona | 334 new corona patients in Pune in last 24 hours

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Update | तुमच्या आधार कार्डमध्ये चुकीचा मोबाईल नंबर आणि ई-मेल नोंदला गेलाय का, ‘या’ पद्धतीने तपासा

Today petrol price | पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | एमडी डॉक्टर सुजित जगतापने या अगोदरही लावला होता महिला डॉक्टरच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा