Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 399 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली असताना आज रुग्णांची (Pune Corona) संख्या वाढली आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या वाढत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 399 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 216 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 94 हजार 185 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 83 हजार 221 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8898 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 2066 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 8961 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 30 लाख 82 हजार 793 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 2066 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.
त्यापैकी 208 रुग्ण गंभीर आहेत. तर 257 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title : Pune Corona | 399 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PSI Suspended | पुण्यातील हॉटेलमध्ये पैसे मागणे पडले महागात, पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

PM Kisan | तुम्ही सुद्धा केले नसेल PM Kisan साठी रजिस्ट्रेशन तर तात्काळ करा ‘हे’ काम, अन्यथा 6000 रुपयांचे होईल नुकसान; जाणून घ्या

Parambir Singh | परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगासमोर हजर होण्यासाठी बजावला चौथा समन्स