Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 399 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दररोज कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे (Omycron Covid Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज सर्वत्र नववर्षाचे स्वागत केले जात असल्याचं पहावयास मिळाले. दिवसभरात पुण्यात तब्बल 399 नवीन कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 127 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही वाढत आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटने देखील चिंता वाढवली आहे. पुण्यात आजपर्यंत 4 लाख 99 हजार 430 रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona) मात केली आहे. पुण्यातील एकुण बाधितांची संख्या आता 5 लाख 10 हजार 617 वर जाऊन पोहचली आहे. आज पुण्यातील एकाचा आणि शहराबाहेरील एका रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत शहरात 9 हजार 117 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2070 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 92 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7588 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (PMC Health Department)

Web Title : Pune Corona | 399 new corona patients in Pune in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalna Crime | विवाहितेची 4 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या; जालना जिल्ह्यातील घटना

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Punit Balan Group | पहिली ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदसाठी लढत!

 

LPG Cylinder Price | नवीन वर्षात मोठी भेट ! थेट 100 रुपये स्वस्त झाला कमर्शियल LPG सिलेंडर, घरगुती सिलेंडरमध्ये बदल झाला का?, जाणून घ्या