Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 44 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (सोमवार) पुणे शहरातील नवीन कोरोना ((Pune Corona) रुग्णांची संख्या पन्नासच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 44 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 89 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 04 हजार 330 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 94 हजार 570 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9074 जणांचा कोरोनामुळे (Pune Corona) मृत्यू झाला आहे.

पुण्यात 686 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 686 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 117 रुग्ण गंभीर आहेत.
तर 97 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4098 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 35 लाख 56 हजार 018 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title :- Pune Corona | 44 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात रिमोट कंट्रोलव्दारे वीज चोरीचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस, जाणून घ्या प्रकरण

Gold Price Today | सोने-चांदीचे दर घसरले, धनत्रयोदशीच्या पूर्वीच खरेदीची संधी; तात्काळ जाणून घ्या नवीन दर

PAN Card | पॅन कार्ड गहाळ झालेय, ‘या’ सोप्या पद्धतीने कोणत्याही कागपत्राशिवाय काढा नवीन PAN Card