Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 75 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण कमी झाले आहे. आज पुण्यातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आल्याने आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने काहींसा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 75 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 44 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 05 हजार 077 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 95 हजार 256 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा (Pune Corona) मृत्यू झाला आहे. हे रुग्ण पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9079 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये आधिच्या आजारामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शहरात 742 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 5176 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 35 लाख 60 हजार 661 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 742 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत. त्यापैकी 106 रुग्ण गंभीर आहेत. तर 083 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title : Pune Corona | 75 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | धक्कादायक ! 9 महिन्यांपासून 14 वर्षीय लेकीवर वारंवार बलात्कार; नराधम जन्मदात्या वडिलाला अटक

Amruta Fadnavis | ‘जाहीर माफी मागून ते ट्विट 48 तासांत डिलिट करा, अन्यथा…’, अमृता फडणवीस यांचा मलिकांना इशारा

Yavatmal Crime | सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरचा खून, कॉलेजमध्ये प्रचंड खळबळ