Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 83 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 83 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 71 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात (Pune Corona) आजपर्यंत 5 लाख 05 हजार 002 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 95 हजार 212 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 2 रुग्ण पुण्यातील आहेत. तर 4 रुग्ण पुणे शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9079 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुण्यात 711 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 711 अ‍ॅक्टिव्ह  रुग्ण आहेत. यामध्ये 115 रुग्ण गंभीर आहेत. तर 71 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5686 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 35 लाख 96 हजार 485 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title :- Pune Corona | 83 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा