Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 86 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणारे रुग्ण (Recover Patient) कमी झाले आहे. आज पुण्यातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 86 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 67 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 05 हजार 163 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 95 हजार 323 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 01 तर पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9080 जणांचा कोरोनामुळे (Pune Corona) मृत्यू झाला आहे.

 

शहरात 760 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 5371 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 36 लाख 07 हजार 032 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 760 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत. त्यापैकी 113 रुग्ण गंभीर आहेत.
तर 71 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title :- Pune Corona | 86 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा