Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 90 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोना (Pune Corona) बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच मृतांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला (Pune Health Department) यश आले असताना नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढवली आहे. नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण (Vaccination) केले जात आहे. पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासात कोरोनाचे 90 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 93 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 

pune शहरात गेल्या 24 तासात 6 हजार 398 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 90 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 37 लाख 07 हजार 180 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 5 लाख 07 हजार 055 जणांना कोरोनाची बाधा (Corona-infected patients) झाली आहे. त्यापैकी 4 लाख 97 हजार 102 रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona) मात केली आहे. शहरामध्ये सध्या 849 रुग्ण सक्रिय (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पुणे शहरात रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण (Pune Corona) कमी झाले आहे. गेल्या 24 तासात शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. मात्र, शहराबाहेरील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुणे शहरातील 9 हजार 104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 92 रुग्ण गंभीर आहेत. तर 57 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona | 90 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ ! किनारपट्टी भागात रेड अलर्ट; पुढील 2 ते 3 तासात पुण्यासह 16 जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

Journalist Vinod Dua | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

Jay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं गाणं, अतिशय गोड व्हिडीओ तुफान व्हायरल

Ramnath Kovind | रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमींचा विरोध ! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतला मोठा निर्णय

PM Kisan | खुशखबर ! 1 आठवड्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 4000 रुपये, राज्य सरकारांनी केली आहे तयारी, चेक करा स्टेटस

Amitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या सेटवर भावूक झाले ‘बिग बी’ अमिताभ, व्हिडीओ पाहून तुमच्या देखील डोळयात पाणी…