Pune Corona | पुण्यात ‘कोरोना’ रुग्णांचे पुन्हा शतक, गेल्या 24 तासात 108 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज पुण्यातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या अधिक असून आज शंभरच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 108 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 94 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 05 हजार 363 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 95 हजार 513 इतके रुग्ण (Pune Corona) बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 2 रुग्ण पुण्यातील आहेत तर 3 रुग्ण पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीबाहेरील आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9084 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 766 अॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 4432 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 36 लाख 16 हजार 354 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 766 रुग्ण अॅक्टिव्ह (active patient) आहेत.
त्यापैकी 101 रुग्ण गंभीर आहेत.
तर 74 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Pune Corona)

Web Titel : Pune Corona | Century of ‘Corona’ patients in Pune again, 108 new patients in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा

World Diabetes Day 2021 | डायबिटीजमध्ये ‘हे’ 8 हेल्दी पदार्थसुद्धा शरीरावर करतात उलटा परिणाम, जाणून घ्या आणि दूर ठेवा

Milind Teltumbde | पोलिसांच्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार? जाणून घ्या तेलतुंबडेचं ‘रेकॉर्ड’

Nana Patole | दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा थेट आरोप

SBI ATM | एसबीआयच्या एटीएममधून डेबिट कार्ड नसेल तरी काढू शकता पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा