Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 103 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात रविवारी (दि.24) 71 कोरोनाबाधित (Pune Corona) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 03 हजार 804 इतकी झाली आहे. तर 103 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 4 लाख 93 हजार 839 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. आज विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 061 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोना बाधितांची (Pune Corona) संख्या कमी असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Pune पुणे शहरातील सक्रिय रुग्ण (Active patient) संख्या 893 इतकी आहे. आज दिवसभरात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 2 शहरातील आहेत तर 7 जण शहराबाहेरील आहेत. शहरातील 9 हजार 072 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी (Pune Corona) ग्रस्त होते.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार,
रविवारी (दि.24) 71 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 061 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.
आज दिवसभरात 09 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 2 पुणे शहरातील तर 07 जण पुण्याबाहेरील आहेत. शहरामध्ये 141 गंभीर रुग्ण आहेत.

Web Title :- Pune Corona | Comfortable ! 103 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | सावत्र मुलावर कोयत्याने सपासप वार करुन केला खून, फरार आरोपी बापाला 3 तासात ठोकल्या बेड्या

Aryan Khan Drugs Case | ‘शाहरुखकडे 25 कोटींची मागणी?, NCB चे अधिकारी वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया

Rupee Bank | रूपी बँकेच्या 4.96 लाख ठेवीदारांना डिसेंबरपर्यंत मिळणार 5 लाख रूपयांपर्यंतच्या ठेवी, जाणून घ्या