Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 82 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. मंगळवारी (दि.26) शहरात 61 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 03 हजार 920 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज 82 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 4 लाख 94 हजार 007 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे.

 

पुणे शहरामध्ये (Pune Corona) आजपर्यंत 35 लाख 24 हजार 537 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 3 हजार 920 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9073 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 840 इतकी आहे.

 

PMC पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार,
आज 61 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 864 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.
आज दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरामध्ये 141 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 121 इतकी आहे.

 

Web Title :- Pune Corona | Comfortable! 82 patients discharged from Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Drugs Case | आणखी एक मोठा ट्विस्ट ! समीर वानखेडेंवर NCB अधिकाऱ्याचा गंभीर आरोप; मलिकांना निनावी पत्र पाठवत, म्हणाले…

Indian Post Home Loan | आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून सुद्धा मिळेल होम लोन, जाणून घ्या सविस्तर माहिती

7th Pay Commission | अर्थ मंत्रालयाने सरकारी कर्मचार्‍यांसाठी 31 टक्के महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून केला लागू