Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 79 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाची (Pune Corona) दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 71 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 79 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 4 हजार 286 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 94 हजार 481 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसांत शहरातील एकाही रुग्णाचा (Pune Corona) कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. त्यामुळे हा पुणे शहराला मोठा दिलासा आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9074 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुण्यात 731 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 731 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 112 रुग्ण गंभीर आहेत. तर 104 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5239 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 35 लाख 51 हजार 920 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title :- Pune Corona | Comfortable! Discharge of 79 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI Quick | एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारे सुद्धा चेक करू शकता SBI अकाऊंट बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया

Dhantrayodashi 2021 | यावेळी धनत्रयोदशीला केवळ 1 रुपयात खरेदी करा सोने, जाणून घ्या काय आहे पद्धत?

Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! ‘या’ कर्मचार्‍यांना मिळणार दिवाळी भेट