Pune Corona | दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं एकही मृत्यू नाही; 118 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. बुधवारी (दि.20) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 112 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 3 हजार 469 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज 118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत 4 लाख 93 हजार 414 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पुणेकरांसाठी मोठी दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

शहरामध्ये आजपर्यंत 34 लाख 94 हजार 837 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 3 हजार 837 जण कोरोना बाधित (Corona infected patients) आढळून आले आहे.
यापैकी 9067 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते.
शहरासाठी दुसरी दिलासादायक बाब म्हणजे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 988 इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.20) 112 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 986 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.
शहरामध्ये 151 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 178 इतकी आहे.

Web Title : Pune Corona | Comfortable! There have been no deaths from corona in Pune in the last 24 hours; 118 patients discharged, learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan च्या 10 व्या हप्त्यासाठी रजिस्ट्रेशन दरम्यान तुमच्याकडून चूक तर झाली नाही ना? जाणून घ्या – कशी करू शकता दुरुस्त?

Mumbai News | नारायण राणे, कृपाशंकर सिंह, विजयकुमार गावित, पाचपुतेंच्या चौकशीचं काय झालं? NCP कार्यकर्त्यांचा सवाल

Pune Crime | वाईन शॉपच्या मालकावर हल्ला ! डोक्यात फोडली दारूची बाटली; 4 जणांवर FIR