Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 68 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. शहरामध्ये नवीन रुग्ण आणि बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. गुरुवारी पुणे शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 239 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 68 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 51 रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona) मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये 68 रुग्णांचे निदान (Pune Corona) झाले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 07 हजार 416 इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात 51 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 4 लाख 97 हजार 518 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शहरात सध्या 792 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण 37 कोटी 94 लाख 736 प्रयोगशाळा तपासणीमध्ये 5 लाख 7 हजार 416 पुणेकरांना कोरोनाची लागण (Corona infection) झाली आहे. सध्या शहरामध्ये 85 रुग्ण गंभीर आहेत. तर 43 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 9106 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pune Corona | Corona 68 new patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ST Workers Strike | एसटी संप चिघळण्याची शक्यता, निलंबनाचा धक्का बसलेल्या एसटी चालकाने उचललं टोकाचं पाऊल

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 54 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | रिक्षा, दुचाकी चोरणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड; रिक्षासह 3 दुचाकी जप्त

Urfi Javed| पुन्हा उर्फीच्या हाॅट अदांनी लावलं लोकांना वेड, निळ्या बिकनीत उर्फीचा बोल्ड अंदाज

Pune Crime | पुण्यातील स्वारगेट परिसरातील अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 48 जणांवर कारवाई