Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 48 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत असताना काल शहरात 108 नवीन रुग्ण आढळून आले होते. मात्र आज (सोमवार) पुणे शहरातील कोरोनाच्या (Pune Corona) नवीन रुग्णांची संख्या पन्नासच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या हजारांच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 48 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 54 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 05 हजार 411 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 95 हजार 567 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील एका रुग्ण समावेश आहे. तर पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9085 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 759 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये (Pune Corona ) सध्या 759 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 97 रुग्ण गंभीर आहेत.
तर 74 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4081 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 36 लाख 20 हजार 435 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

हे देखील वाचा

Mumbai NCB | मुंबई एनसीबीची नांदेडमध्ये मोठी कारवाई ! 4 कोटींचा गांजा जप्त

ST Workers Strike | एसटी कामगारांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत शरद पवारांचे महत्वाचे विधान, म्हणाले…

Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Corona | Diagnosis of 48 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update