Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 51 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (सोमवार) पुणे शहरात कोरोनाच्या (Pune Corona) 51 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या हजारांच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 73 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 06 हजार 621 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 96 हजार 688 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात शहराबाहेरील 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9103 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 830 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 830 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Pune Corona) आहेत.
यामध्ये 96 रुग्ण गंभीर आहेत. तर 58 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3118 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आज पर्यंत शहरात 36 लाख 80 हजार 394 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title :- Pune Corona | Diagnosis of 51 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

Omicron Variant | ’ओमिक्रॉन’ किती धोकादायक? सध्याची लस प्रभावी ठरेल का? कशी आहेत लक्षणं? WHO नं याबाबत केलं सावध, जाणून घ्या

Nikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते म्हणाले – ‘ही लवकरच उर्फी जावेद…’