Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 79 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. आज (गुरुवार) पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या आसपास आली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) 79 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 52 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 08 हजार 624 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 98 हजार 618 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 01 तर पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

शहरामध्ये सध्या 895 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 82 रुग्ण गंभीर आहेत.
तर 58 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6692 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 38 लाख 15 हजार 047 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (PMC Health Department)

 

Web Title :- Pune Corona | Diagnosis of 79 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा