Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 81 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरात कोरोनाच्या (Pune Corona) 81 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या हजारांच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 88 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 07 हजार 136 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 97 हजार 190 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील एक आणि शहराबाहेरील एका रुग्णाचा (Pune Corona) समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 105 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

Pune शहरामध्ये सध्या 841 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 96 रुग्ण गंभीर आहेत.
तर 56 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5 हजार 878 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आज पर्यंत शहरात 37 लाख 13 हजार 058 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (PMC Health Department)

 

Web Title :- Pune Corona | Diagnosis of 81 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | मद्यप्राशन करुन भरधाव बुलेट चालवणे बेतलं जीवावर, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

PM Kisan | तुमच्या स्टेटसमध्ये सुद्धा लिहीलाय का ‘हा’ शब्द, जाणून घ्या काय आहे अर्थ आणि केव्हापर्यंत येईल रक्कम?

Pune Crime | एक्सर्बिया डेव्हलपर्सकडून 45 लाखांची फसवणूक ! कंपनीचे संचालक विशाल नहार, राहूल नहार, सचिन पाटील, नितीन सैद यांच्यावर FIR