Pune Corona | पुणे शहरात ‘कोरोना’च्या 90 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात कोरोना (Pune Corona) नियंत्रणात आला असून दैनंदिन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या कमी झाली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात आज (गुरुवार) दुपारी चार वाजेपर्यंत कोरोनाच्या (Pune Corona) 90 रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचवेळी 47 रुग्ण बरे (Recover) झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या होती. मात्र, आता पुण्यातील नवीन रुग्णांची (Pune Corona) संख्या कमी झाल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 864 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील दोन तर शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे.
आजपर्यंत शहरात 9 हजार 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये काही रुग्णांना आधिपासूनच वेगवेगळे आजार होते.

 

गेल्या 24 तासात तपासण्यात आलेल्या 4411 प्रयोगशाळा तपासणीत 90 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शहरात आतापर्यंत 36 लाख 64 हजार 153 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
यामध्ये 5 लाख 6 हजार 291 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 96 हजार 326 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरातील विविध रुग्णालयांत सध्या 105 गंभीर रुग्णांवर उचार सुरु आहेत. तर 67 रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरु आहेत.

 

Web Title : Pune Corona | Diagnosis of 90 new patients of ‘Corona’ in Pune city, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP MP Heena Gavit | ‘घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला’

Pune Fire | महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाइन फटून आग, मोठा अनर्थ टळला

Will Smith | ‘ब्रेकअपनंतर मी असंख्य महिलांशी सेक्स केलं’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा