Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 94 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (गुरुवार) पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आसपास आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 94 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 54 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 04 हजार 589 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 94 हजार 786 इतके रुग्ण (Pune Corona) बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9076 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुण्यात 727 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 727 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 94 रुग्ण गंभीर आहेत.
तर 99 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4852 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 35 लाख 70 हजार 441 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title :- Pune Corona | Diagnosis of 94 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा