Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 122 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. सोमवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 70 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 3 हजार 245 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 93 हजार 177 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

आज पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. रुग्ण संख्येत घट झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची (Pune Corona) संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 70 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 122 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

Pune City मध्ये आजपर्यंत 34 लाख 84 हजार 071 जणांची कोरोना (Pune Corona) चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 3 हजार 245 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9065 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 1 हजार 003 इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार,
सोमवारी (दि.18) 70 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 675 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.
आज दिवसभरात 122 कोरोनामुक्त झाले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
यापैकी 1 पुणे शहरातील आहेत तर 1 जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरामध्ये 164 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 216 इतकी आहे.

 

पुणे जिल्ह्यात 4630 अ‍ॅक्टिव्ह

Pune District तील कोरोना (Pune Corona) बाधीत एकूण 11 लाख 47 हजार 29 रुग्णांपैकी 11 लाख 23 हजार 470 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 4 हजार 630 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.95 टक्के आहे.

 

Web Title :- Pune Corona | Discharge of 122 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Worli Atria Mall | ‘हिजाब’ घातल्याने महिलेला Resto रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Bacchu Kadu | बच्चु कडू यांचा ‘मविआ’ सरकारला घरचा आहेर; म्हणाले – ‘सरकारनं एक तरी पारदर्शक काम करावं’

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 84 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी