Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 126 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये कोरोनाची (Pune Corona) दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 106 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 126 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 3 हजार 175 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 93 हजार 055 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 02 तर पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीबाहेरील 01 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9064 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 1056 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 1056 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 166 रुग्ण गंभीर आहेत. तर 221 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5488 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात (Pune Corona) आली आहे.
आतापर्यंत 34 लाख 79 हजार 396 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
(Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | Discharge of 126 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

E-Shram Portal | आतापर्यंत 4 कोटी मजूरांनी केले रजिस्ट्रेशन; महिला कामगार आघाडीवर

7th Pay Commission | रिव्हाईज्ड HRA चा सॅलरीत समावेश झाल्याने कर्मचार्‍यांना वार्षिक किती होईल फायदा, जाणून घ्या

Mumbai Crime | राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागणारी टोळी गजाआड ! मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याला अटक; अभिनेत्रीला नोटीस