Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 172 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. मंगळवारी (दि.28) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 158 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 652 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 90 हजार 231 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात ((Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

शहरामध्ये आजपर्यंत 33 लाख 51 हजार 570 जणांची कोरोना (Pune Corona) चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 652 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9025 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते. आजपर्यंत 4 लाख 90 हजार 231 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 1 हजार 396 इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.28) 158 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 901 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. आज दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 3 पुणे शहरातील आहेत तर 5 जण पुण्याबाहेरील आहेत. शहरामध्ये 158 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 212 इतकी आहे.

Web Title :- Pune Corona | Discharge of 172 corona patients in Pune city in last 24 hours, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Royal Enfield Bullet 350 | 15 हजार देऊन घरी घेऊन जा दमदार क्रूझर बाईक, इतका असेल मंथली EMI; जाणून घ्या

Pune Metro Recruitment 2021 | पुणे मेट्रोमध्ये 96 जागांसाठी मोठी भरती; पगार 2 लाखांपर्यंत

Maharashtra Cabinet Decision | प्रभाग पध्दतीवर ठाकरे मंत्रिमंडळाचे ‘शिक्कामोर्तब’ ! मनपा, नगरपालिका अन् नगर पंचायतीमध्ये ‘या’ पध्दतीची असेल ‘रचना’