Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 218 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona | पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दोन हजाराच्या जवळपास आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 196 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 218 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 98 हजार 183 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 87 हजार 165 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 1 रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8977 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2041 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2041 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 217 रुग्ण गंभीर आहेत. तर 290 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5722 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 32 लाख 33 हजार 091 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Titel :- Pune Corona | Discharge of 218 corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात मेडिकल दुकानात चोरी, चोरट्यांचा 2 मिनीटात लाखो रुपयांवर डल्ला (व्हिडीओ)

Maruti Alto झीरो डाउन पेमेंटमध्ये 1.1 लाखात खरेदी करा, कंपनी देईल 6 महिन्यांच्या वॉरंटीसह मनी बॅक गॅरंटी; जाणून घ्या

Shivsena | यूपी निवडणूकीत शिवसेना 100 जागा लढणार, संजय राऊत यांची घोषणा