Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Pune Corona) संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 236 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 243 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 86 हजार 905 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected
patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 75 हजार 567 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर पुणे महापालिका
हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8761 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2577 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2577 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 223 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6970 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

हे देखील वाचा

Minister Nitin Raut | पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

Pune News | पुण्यातील निर्बंधाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Corona | Discharge of 243 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update