Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 244 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून इतर आकडेवारी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या अडीचशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दोन हजाराच्या जवळपास आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या (Pune Corona) अधिक होती. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 218 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 244 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 90 हजार 446 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 79 हजार 501 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 06 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8847 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2098 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2098 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 204 रुग्ण गंभीर आहेत.
तर 289 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8876 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 30 लाख 04 हजार 739 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title : Pune Corona | Discharge of 244 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, knowing other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Weather Updates | यूपीसह ‘या’ राज्यात जोरदार पावसाचा इशारा, जाणून घ्या महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज

Rain In Maharashtra | पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 9 जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट

Ajit Pawar | नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…