Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात 432 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona |पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या वर गेली असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या चारशेच्या वर आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 321 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 432 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 83 हजार 520 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 71 हजार 909 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 09 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2926 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2926 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 234 रुग्ण गंभीर आहेत. तर 489 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8052 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 27 लाख 78 हजार 674 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Titel :- Pune Corona | Discharge of 432 patients in last 24 hours in Pune city

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट