×
Homeताज्या बातम्याPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात 'कोरोना'च्या 57 रुग्णांना डिस्चार्ज,...

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 57 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. रुग्ण संख्येत घट झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 47 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 57 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 04 हजार 806 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 95 हजार 082 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीबाहेरील आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9077 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुण्यात 647 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 647 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 104 रुग्ण गंभीर आहेत. तर 75 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3695 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 35 लाख 85 हजार 745 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे,
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title :- Pune Corona | Discharge of 57 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News