Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 75 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. रविवारी (दि.21) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 95 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 5 हजार 961 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज 75 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत 4 लाख 95 हजार 998 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

 

 

शहरामध्ये आजपर्यंत 36 लाख 48 हजार 289 जणांची कोरोना चाचणी (Pune Corona) करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 5 हजार 961 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9096 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 867 इतकी आहे.

 

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार,
रविवारी (दि.21) 95 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आज विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 171 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.
आज दिवसभरात 04 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 2 पुणे शहरातील आहेत तर 2 जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरामध्ये 102 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 78 इतकी आहे.

 

Web Title :- Pune Corona | Discharge of 75 corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा