Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 88 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 38 नवीन रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 88 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover) केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने थोडासा दिला मिळाला होता. मात्र, कोरोना व्हायरसचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (omicron variant) एक रुग्ण आढळून आल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.

 

पुण्यात गेल्या 24 तासात विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 426 संशयित रुग्णांची (Pune Corona) तपासणी केली असून यामध्ये 38 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यात आजपर्यंत 37 लाख 17 हजार 484 जणांची प्रयोगशाळा तपासणी (Laboratory Test) करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख 7 हजार 174 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 लाख 97 हजार 278 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

शहरामध्ये सध्या 797 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
यामध्ये 84 रुग्ण गंभीर आहेत. तर 54 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.
गेल्या 24 तासात पुणे शहरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून ते शहाबाहेरील आहेत.
शहरात आजर्पंयत 9 हजार 105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आधिच्या आजारामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pune Corona | Discharge of 88 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PPF Account | पीपीएफ खाते दुसर्‍या बँकेत ट्रान्सफर करणे आता झाले आणखी सोपे, या 5 स्टेपमध्ये करावे लागेल अप्लाय

Central Civil Services (Conduct) Rules | तुम्ही प्रॉपर्टीत गुंतवणूक केलीय आणि डिपार्टमेंटला कळवले नाही? मग व्हा सावध, जाणून घ्या काय आहे नवीन सर्क्युलरमध्ये

Narayan Rane | नारायण राणेंचा खोचक टोला; म्हणाले – ‘मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का?’