Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 96 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये कोरोनाची (Pune Corona) दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 47 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 96 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 04 हजार 690 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 94 हजार 943 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9077 जणांचा (Pune Corona) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुण्यात 670 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

पुणे शहरामध्ये सध्या 670 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 105 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 2610 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | Discharge of 96 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Fastag | अ‍ॅक्सीडेंट झाल्यानंतर गाडीवरील फास्टॅग काढून टाका, जाणून घ्या काय आहे कारण?

Pune Crime | … म्हणून दुकानमालकाच्या डोक्यात हातोड्याने केली मारहाण; विश्रांतवाडीतील टिंगरेनगर रोडवरील घटना

Pune Crime | ‘ब्रेकअप’ नंतर तरुणीला लग्नाची गळ ! ‘तुझे फोटो व्हायरल करेन, आई-वडिलांना ‘खल्लास’ करण्याची धमकी; ‘मजनू’ ‘गोत्यात’, पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना